Views


*16 नोव्‍हेंबरच्या विशेष ग्रामसभेत मतदारांनी मतदान यादीतील नावाची पडताळणी करावी - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर*



उस्मानाबाद/प्रतिनिधी

मतदार यादीमधील नोंदणीमध्‍ये दुरुस्‍ती, नाव वगळणी तसेच नवीन नोंदणी इत्‍यादी प्रकीया गावातील नागरिकांपर्यत सुलभतेने पोहोचण्याकरिता 16 नोव्हेंबर 2021 रोजी प्रत्‍येक ग्रामपंचायतीमध्‍ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्‍यात येणार असून यामध्ये नागरीकांनी आपली नावे मतदार यादीत आहेत का ? याची पाहाणी करुन घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे
विशेष ग्रामसभेत मतदार यादीच्‍या अनुषंगाने मतदार यादीचे वाचन करण्‍यात येणार आहे, गावातील सर्व नागरिकांना मतदार यादीमधील नोंदी तपासून घेण्‍यासाठी सांगण्‍यात येणार आहे. तसेच मतदार यादीतील नोंदीबाबत नागरिकांना काही हरकती असल्‍यास, त्‍या नोंदीमध्‍ये दुरुस्‍ती करावयाची असल्‍यास अथवा नाव नसलेल्‍या पात्र नागरिकांना त्‍यांचे नाव नव्‍याने नोंदवावयाचे असल्‍यास त्‍यांना विहित अर्ज ग्रामसभेत उपलब्‍ध होणार आहेत. त्‍याचप्रमाणे मृत मतदार आणि कायम स्‍थलांतरीत मतदारांच्‍या नावांची वगळणी, लग्‍न होवून बाहेर गेलेल्‍या महिलांची वगळणी, तसेच लग्‍न होवून गावात आलेल्‍या महिलांच्‍या नावाची नोंदणी , दिव्‍यांग मतदार चिन्‍हांकीत करणे आणि ज्‍यांचे 1 जानेवारी,2022 रोजी 18 वर्ष पूर्ण होत आहे त्‍यांची नवीन मतदार म्‍हणून नोंदणी करण्‍याच्‍या कामावर भर देण्‍यात येणार आहे.



तसेच जिल्‍हयात 16 नोंव्‍हेंबर रोजी येथील जिल्‍हा परिषदे मार्फत ग्रामपंचायत स्‍तरावर विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्‍यात येणार असलेने नागरिकांनी विशेष ग्रामसभेत उपस्थित राहून मतदार यादीमध्‍ये आपले नाव आहे किंवा कसे याची पडताळणी करून घ्यावी.असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.



*ऑनलाईन नाव नोंदणीची देणार माहिती*



या विशेष ग्रामसभेमध्‍ये ग्रामसेवक व संबंधित गावातील मतदान केंद्रस्‍तरीय अधिका-यांनी(BLO) नागरिकांना अर्ज भरण्‍याबाबत मार्गदर्शन करतील. त्‍याचप्रमाणे नागरिकांकडून प्राप्‍त होणा-या हरकती, आक्षेप, दुरुस्‍ती व नाव नोंदणी अर्ज एकत्र करुन ग्रामपंचायत कार्यालय संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्‍याकडे पाठविण्‍यात येणार आहे. तसेच online नाव मतदार यादीत नोंदविणेसाठी उपलब्‍ध NVSP व Voter Helpline App याबद्ल हि माहिती दिली जाणार आहे.
 
Top