Views


*संत रविदास महाराज सार्वजनिक जनता वाचनालयाचे उद्घाटन*


उस्मानाबाद/प्रतिनिधी

उमरगा तालुक्यातील पेठसांगवी येथे संत रविदास महाराज सार्वजनिक जनता वाचनालयाचे उद्घाटन लोहारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनीलकुमार काकडे यांच्या हस्ते फीत व दीपप्रज्वलन करून गुरुवारी सायंकाळी करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच सुमनताई सुभेदार होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून कुनाळी गावाचे सरपंच किरण कुकडे ,पत्रकार महेबुब उर्फ मुन्ना फकीर, पत्रकार नीलकंठ कांबळे, पत्रकार गणेश खबोले, पत्रकार दिलीप सुरवसे, जवळगा बेट चे उपसरपंच बालाजी गायकवाड उपस्थित होते. यावेळी लोहारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनीलकुमार काकडे यांनी वाचनालयाचे महत्त्व बोलताना सांगितले की ग्रंथ हेच गुरु हे वाक्य सध्या साध्य होण्या जोग आहे गेल्या कित्येक काळापासून गुरु शिष्य हीच परंपरा सुरू आहे पण आज कालची पिढी गुरु शिष्य ही परंपरा विसरत जात आहेत पुढील पिढीचे वाचनालय हेच गुरु असतील असे प्रतिपादन. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी हरिभाऊ भोसले, नागनाथ यमगर, माजी उपसरपंच सदानंद बिराजदार, माजी सरपंच गणेश पाटील, माजी उपसरपंच प्रकाश सुभेदार, सरपंच प्रतिनिधी धनराज सुभेदार, पोलिस पाटील ईश्वर सूरवसे, तंटामुक्त अध्यक्ष दत्तू राऊत, शालेय समिती अध्यक्ष संतोष सुरवासे, ग्रा.पं‌.सदस्य गिरमन दलाल, शंकर उदासे, नीलकंठ राठोड, ज्ञानेश्वर शिंदे, सिराज पठाण, अमर यमगर, बंडू राठोड, विनोद पाटील, तीपय्या स्वामी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण कांबळे, उपाध्यक्ष सूरज भोसले,सचिव परमेश्वर कांबळे,जोतिबा कांबळे,श्याम कांबळे, मनोहर कांबळे, धनराज कांबळे, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप सुरवसे यांनी केले तर आभार प्रकाश सुभेदार यांनी मानले.
 
Top