Views


*"संजय गांधी योजनेतील निराधारांची दिवाळी काळी"..आ.प्रविण दटके*


नागपूर:-

दि. 29 आक्टोबर 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत संजय गांधी निराधार व श्रावण बाळ निव्रुत्ती योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचे प्रलंबित अनुदान 30 आँक्टोबर 2021 पर्यंत त्यांचे खात्यात जमा करण्याबाबत निर्देश दिले होते. पालकमंत्र्यांच्या ह्या निर्देशाबाबत प्रसिद्धी करण्यात आली होती. पालकमंत्री राऊत हे निराधार लाभार्थ्यांच्या प्रश्नाबाबत कधी ही गंभीर नव्हते व ते आता सुद्धा नाहीत असे गंभीर आरोप दि. 6 नोव्हेंबर रोजी पत्रपरिषदेत भा.ज.पा आमदार प्रविण दटके यांनी पालकमंत्री व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर ताशेरे ओढले. दि.21 आँक्टोबर 2021 ला झालेली आढावा बैठक व त्या मध्ये देण्यात आलेले निर्देश दि. 22 आँक्टोबर 
2021 रोजी निघणाऱ्या मोर्चा अयशस्वी व्हावा म्हणून करण्यात आलेला प्रयत्न होता।.

      संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या हजारो व्रुद्ध, दिव्यांग, विधवा व अनाथ लाभार्थ्यांना आज पर्यंत अनुदानाची राशि प्राप्त न झाल्याने त्यांची दिवाळी अंधारमय झाली आहे. या करिता पालकमंत्री नितीन राऊत हे जवाबदार असून त्यांनी निराधार लाभार्थ्यांची माफी मागावी व निराधार लाभार्थ्यांचे प्रलंबित अनुदान राशि चे त्वरित वाटप करण्यात यावे. अशी मागणी देखिल आ. प्रविण दटके यांनी पत्रपरिषदेत ऊदबोधन केले. जर सात दिवसात निर्णय घेतले गेले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. असेही ते म्हणाले. 
     पत्रपरिषदेत उपस्थित आ.प्रविण दटके. आ.गिरीश व्यास, आ.क्रुष्म्णा खोपडे, अर्चना डेहनकर, संजय बालपांडे इ.होते.



 
Top