Views


*मस्सा ख येथे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व शिक्षक यांचा अनिवासी मस्सेकर व्हाट्सअप ग्रुप तर्फे सोनाटा मनगटी घड्याळ व शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार*


 कळंब/प्रतिनिधी

तालुक्यातील मस्सा खं येथे अनिवासी मस्सेकर व्हाट्सअप ग्रुप च्या वतीने जि प शाळेतील NMMS शिष्यवृत्ती धारक 19 विद्यार्थी व परिश्रम घेणारे त्यांचे शिक्षक अब्दुल माजिद काझी यांचा सत्कार करण्यात आला .विद्यार्थ्यांना सोनाटा कंपनीचे मनगटी घड्याळ व सहा रजिस्टर ,एक पेन असे शैक्षणिक साहित्य प्रत्येकाला देऊन गौरविण्यात आले. गावातील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये शिक्षण घेऊन बाहेर नौकरी करणारे या शाळेचे माजी विद्यार्थी तसेच गावाबद्दल व विद्यार्थ्यांप्रति तळमळ असणारे दिवाळीच्या सुट्टीत गावी येवून सतत विध्यार्थींना मार्गदर्शन करुन ,प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा व बक्षीस म्हणून सोनाटा मनगटी घड्याळ व शैक्षणिक साहित्य भेट देत कौतुक केले. अनिवासी मस्सेकर व्हाट्सअप ग्रुप मधील या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अहमदपूर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रा.विजयकुमार किलचे , कासारवडवली , ठाणे येथे कार्यरत असलेले मुख्याध्यापक व आदर्श शिक्षक जयकुमार घोडके ,दौंड येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले झनक भानुदास वरपे यांच्या वतीने हे बक्षीस देण्यात आले . यावेळी मस्सा ख सरपंच प्रा. सौ. राजश्री धनंजय वरपे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या तर उपसरपंच श्री.विश्वनाथ तांदळे, ग्रामपंचायत सदस्य श्री.अक्षय माळी, ग्रा प सदस्य प्रा .दत्तात्रय सांवत , शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री.संभाजी वरपे ,युवासेना उपतालुकाप्रमुख प्रा.आमोल शिंगटे श्री.धनंजय वरपे . अभियंता पाटबंधारे विभाग , या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी श्रीकृष्ण राऊत,लक्ष्मण वेदपाठक दै. लोकमतचे पत्रकार रसुल तांबोळी आणि विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. *⃣ आम्ही ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचा अम्हाला ला सार्थ अभिमान आहे त्यामुळे यापुढील काळात ही विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत उत्साह निर्माण करण्याकरिता आम्ही वाटेल ती मदत करण्याकरिता तयार आहोत व असेच पुरस्कार देऊन विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सन्मानित करण्यात आम्हाला आनंद मिळतो . . श्री. विजय कुमार किलचे सहशिक्षक अहमदपूर
 
Top