*एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने न्याय द्यावा - रामदास कोळगे*
उस्मानाबाद/प्रतिनिधी
महाराष्ट्रात सुरू असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचार्यांनी पुकारलेल्या त्यांच्या रास्त मागण्या साठी महाराष्ट्र सरकारने त्यांच्या मागण्याचा विचार करून त्यांना न्याय द्यावा असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा चे पूर्व मराठवाडा संपर्क प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांनी आंदोलनाला भेट देऊन व्यक्त केले. गेल्या अनेक वर्षापासून एसटी महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रवाशांना सुखाचा प्रवास करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करून त्यांनी प्रवाशांना चांगल्या प्रकारची सेवा दिलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून राज्यभरातले सर्व कर्मचारी तुटपुंजा वेतनावर काम करत आहेत आत्ता त्यांना जगणे मुश्कील झालेल आहे एवढं कमी वेतन मिळत असल्यामुळे महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांनी बंद पुकारून राज्य सरकारच्या विरोधात आवाज उठवण्याचे काम सुरू केलेले आहे उस्मानाबाद येथे एसटी स्टँड मध्ये सुरू असलेल्या आंदोलन त्याला पाठिंबा देऊन आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन मागे घ्यायचं नाही अशा प्रकारची भावना रामदास कोळगे यांनी व्यक्त केली. एसटी च्या माध्यमातून राज्य सरकारला मोठ्या स्वरूपात महसूल मिळतो पण त्या पैशाचा व्यवस्थित वापर न करता तो पैसा गायब केला जातो गेल्या दोन वर्षापासून तर या कर्मचाऱ्यांचे कोरोना काळात अति हाल होताना दिसून येत आहे त्यामुळे राज्य सरकारने तातडीने कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करून राज्यातील होत असलेल्या प्रवाशांचे हाल थांबवावेत असेही शेवटी कोळगे यांनी विचार व्यक्त केले. यावेळी कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.