Views


*शासकीय योजनांच्या माहिती देण्यासाठी गुरुवारी भव्य महामेळाव्याचे उस्मानाबाद शहरात आयोजन या महामेळाव्याचा लाभ घेण्याचे प्रमुख जिल्हा न्यायधीश पेठकर यांचे आवाहन*

उस्मानाबाद/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार Pan India Awareness And Outreach Programme अंतर्गत येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषद, परिसरातील नाटयगृहाच्या प्रांगणात दि.11 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 9.30 ते 5.00 वाजेपर्यंत शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी व लाभ देण्यासाठी महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या महामेळाव्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्याना, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश के.आर.पेठकर यांनी आज येथे केले. या महामेळाव्याचीसाठी आज पूर्व तयारीची बैठक घेण्यात आली तेव्हा ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, अपर जिल्हाधिकारी रूपाली आवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के.पाटील आणि सर्व कार्यालय प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री . दिवेगावकर यांनी अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यालयाशी संबंधित योजनांची माहिती देण्याकरिता मेळाव्याच्या ठिकाणी डेडीकेटेड स्टॉल लावावेत, असे आदेश दिले. या मेळाव्यामध्ये आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार आहे.त्याच बरोबर विविध शासकीय कार्यालयातील लघू उद्योग, रेषीम उद्योग,पशुपालन, कृषी विषयक,समाज कल्याण इत्यादी योजनांची माहिती आणि पात्र नागरिकांना योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.तसेच आरोग्य तपासणी आणि कोरोना लसीकरण केले जाणार आहे. या महामेळाव्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा , असे आवाहन यावेळी न्यायधीश पेठकर आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव वसंत यादव यांनीही केले आहे.
 
Top