*औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बनले लुटांरूचे केंद्र*
उस्मानाबाद/प्रतिनिधी
औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील क्रमांक 62 लुटीचे प्रकार थांबत नसल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे सावट येरमाळा तालुका कळंब हद्दीत आठ दिवसात पुन्हा ट्रक नोटेचा प्रकार घडल्याने पोलिसांसमोर आवाहन उभे राहिले आहे.
औरंगाबाद -सोलापुर राष्ट्रीय महामार्ग उस्मानाबाद जिल्ह्यातून जातो हा रस्ता लुटारूंचे केंद्र बनत आहे. रात्रीच्या वेळी चालत्या वाहनात चढणे महामार्गावर लोखंडी रॉड,जॅक टाकून प्रवाशांना अडविणे. त्यांच्या वाहनाला अपघात घडवून आणून त्यांना लुटणे असे प्रकार घडत आहे. 31 ऑक्टोबरच्या मध्ये रात्री साखरेचे पोते घेऊन जाणाऱ्या ट्रकची गती कमी झालेले असतांना ट्रक वर चढुन
चोरट्याने टारपोलिन फाडून 14 साखरेची पोती लंपास केली . चालकाच्या लक्षात आल्याने त्यांनी पेट्रोल पंप घेऊन गेला. त्यानंतर अवघ्या आठ दिवस दुसरा प्रकार घडला आहे.
हिरीयूर (जि. चेत्रदुर्गा राजस्थान) येथून एक मिनी ट्रक आर.जे. ११.जीबी.७८१२ हे नारळ पावडर घेऊन निघाला होता रविवारी पहाटे तीनच्या सुमारास तेरखेडा पारधी पेढीच्या दरम्यान ट्रक आल्यानंतर गती कमी झाली. याचा फायदा घेत एक चोरटा गाडीवर चढला त्यानंतर त्यांने ट्रकची टारपोलिन फाडून मिनी ट्रक मधील ४५ हजार ५०० रुपयाचे १४ पावडरची पोते धावत्या ट्रकमधून लंपास केले.ट्रक चालकि हरपालसिंग सैतानसिंग चौधरी रा.हाथरस उत्तरप्रदेश यांने दिलेल्या माहितीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.