*शहरात वाहतूकीची कोंडी पोलिस प्रशासन ची कार्यवाही*
*राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे*
कळंब/प्रतिनिधी
शहरातून जाणाऱ्या खामगाव -पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम पुन्हा ठप्प झाल्याने शहरातील नवीन बस स्थानक ते अहिल्यादेवी होळकर चौकापर्यंत मध्ये वाहनांची कोंडी होत आहे. हे काम कधी पूर्ण होणार याचे उत्तर कोणाकडे नसले तरी या मार्गावरील जड वाहन बायपासने वळविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे .
कळंब शहरातून जाणाऱ्या खामगाव- पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील जवळपास ३ वर्षापासून चालू आहे. उपजिल्हा रुग्णालय ते शासकीय गोदाम हा शहरातील भागाच्या रस्त्याची रुंदी 100 फुटाचे असणार आहे. त्यातील अर्ध्या रुंदीकरणाचे काम झाले आहे.
या रस्त्याचे रुंदीकरण करताना काही दुकानांची पुढील भाग काढावे लागणार आहे. पावसाळ्यात ही अतिक्रमणे काढता येणार नसल्याने त्या दुकानाला अभय मिळाले होते. पण आता याबाबत कारवाई हाती घेण्याची शक्यता आहे .या मार्गाच्या दोन्ही बाजूला नगर परिषद व बाजार समिती च्या मालकीची जागा आहे.
त्यामुळे निर्धारित रस्त्याच्या रुंदी मध्ये येणारी दुकाने किंवा त्याचा भाग हटविण्यास कंपनीला तांत्रिक अडचण येण्याची शक्यता नाही .मात्र कंपनीच्या कामाची गती पाहता यात आणखीन कोणते साल उजाडावे लागेल. याबाबत खुद्द कंपनीचा सांगू शकेल परंतु या रखडलेल्या कामामुळे शहरातील ट्राफिक जाम प्रश्न मात्र दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. नवीन बसस्थानकापासून चे काम झाले आहे. पोलीस निवासस्थानाजवळ पुलाचे काम रखडले आहे. काही ठिकाणी जलवाहिनीमुळे काम खोळंबले आहे.
रस्त्याच्या पूर्ण रूंदीचे काम कोठेच पूर्ण झाले नसल्याने उकरून ठेवलेले रस्ता 'जैसे थे' आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने एकेरी वाहतूक होत आहे. रस्त्याच्या खाली उतरले तर अपघात नक्की ठरलेला आहे. त्यात रस्त्याच्या बाजूला वाहने लावून नागरिक बाजारपेठेत खरेदीसाठी जातात त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. परिणामी अनेकदा छत्रपती शिवाजी महाराज चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, या भागात वाहतुकीची मोठी कोंडी होते त्यामुळे अनेकदा पोलिस व वाहनधारकामध्ये वाद होतात. पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहने लावायची कोठे या प्रश्न यावर पोलिस कडे उत्तर नसल्याने त्यांना ही कारवाई आवरती घ्यावी लागते.तरी पोलिस प्रशासनाकडून कार्यवाही करतांना पाहवयास मिळत आहे.