Views


*घराजवळ फटाके वाजवण्याच्या कारणा वरून लाथाबुक्क्यांनी मारहाण*

नळदुर्ग/प्रतिनिधी

हंगरगा (नळ) तांडा येथील काशीनाथ वसंत चव्हाण यांनी दि. 05.11.2021 रोजी गावकरी- कंटू किसन राठोड यांना घराजवळ फटाके वाजवण्यास मनाई केली. यावर चिडून जाउन कंटू राठोड यांसह जळकोटवाडी येथील अजय जाधव, विजय जाधव यांनी काशीनाथ चव्हाण यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठी, लाकडी फळीने मारहान करुन जखमी केले. यावेळी काशीनाथ यांच्या बचावास त्यांची आई आली असता त्यांसही नमूद तीघांनी शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या काशीनाथ चव्हाण यांनी दि. 06.11.2021 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
 
Top