*घर-जागेच्या कारणावरुन जुन्या वादातून मारहाण*
उस्मानाबाद/ प्रतिनिधी
वाशी तालुक्यातील वडजी, येथील संजय विरसेन ढाकणे व बालाजी चंद्रकांत मोराळे यांच्यात घर-जागेच्या कारणावरुन जुना वाद आहे. दि. 06.11.2021 रोजी 11.00 वा. सु. गावातील ग्रामपंचायत कार्यालयासामोर या वादाचे पर्यावसान हानामारीत होउन बालाजी मोराळे यांनी संजय ढाकणे यांना शिवीगाळ करुन लोखंडी गज, काठीने मारहान करुन जखमी केले तर संजय ढाकणे यांनी बालाजी यांचे भाऊ- जगदीश मोराळे यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहान करुन त्यांच्या डाव्या हातावर सुरीने वार करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संजय ढाकणे व जगदीश मोराळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येरमाळा पोलिस ठाण्यात भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.