*जून्या वादातून महीलेस मारहाण*
कळंब/प्रतिनिधी
तालुक्यातील दाभा येथील सत्यभामा ईरगट या दि. 06.11.2021 रोजी 06.00 वा. घरासमोरील अंगनात सडा टाकत होत्या. यावेळी शेजारील- अशोक बलभीम टेळे यांनी पुर्वीच्या वादातून सत्यभामा यांना पाठीमागून लाथमारुन खाली पाडले. तसेच शिवीगाळ करुन बाजूस असलेल्या बकेटीतील पाणी सत्यभामा यांच्या अंगावर टाकून बकेट डोक्यात मारुन त्यांना जखमी केले. यावेळी सत्यभामा यांच्या बचावास आलेल्या त्यांच्या सुनेसही बकेट मारुन मुकामार दिला. अशा मजकुराच्या सत्यभामा ईरगट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिराढोण पोलिस ठाण्यात भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.