Views


*लोहारा नगरपंचायतचे प्रभाग निहाय आरक्षण जाहिर*

उस्मानाबाद/प्रतिनिधी


लोहारा तहसिल कार्यालयात प्रभारी उपविभागीय अधिकारी राहुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थित लोहारा नगरपंचायतीच्या सदस्यपदांच्या आरक्षणाची सोडत दि
15 नोव्हेंबर रोजी लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढुन काढण्यात आली. याप्रसंगी तहसिलदार संतोष रुईकर, मुख्यधिकारी गजानन शिंदे, कार्यालयीन अधिक्षक जगदिश सोडगे यांच्यासह आदी, उपस्थित होते. लोहारा नगरपंचायतची दुसरी पंचवार्षीक निवडणुक होत असुन त्याअनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या अधिसूचनेनुसार 1 फेब्रुवारी रोजी प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगरपंचायतीच्या प्रभागांची संख्या, त्यांची प्रभागनिहाय एकूण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीची 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन, नकाशा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आरक्षण यासह मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले. 4 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांनी नगरपंचायत प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता दिली. व 8 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी व नगरपंचायतकडून सदस्यपदांच्या आरक्षणाच्या सोडतीकरिता नोटीस प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार 10 फेब्रुवारी रोजी नगरपंचायतीच्या सदस्यपदांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली होती. पण ती रद्द करुन सोमवारी 15 नोव्हेंबर रोजी नगरपंचायतीच्या सदस्यपदांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यात अनुसुचित जातीसाठी दोन प्रभाग आरक्षित आहे. यामध्ये एक महीलेसाठी, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी चार यात महिलासाठी दोन तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 11 यात महिलासाठी सहा प्रभाग राखीव आहेत.
लोहारा नगरपंचायत 1 ते 17 प्रभागाचे आरक्षण सोडत याप्रमाणे
प्रभाग क्रमाक 1 सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्रमांक 2 सर्वसाधारण(महिला) 
प्रभाग क्रमाक 3 सर्वसाधारण 
प्रभाग क्रमाक 4 सर्वसाधारण 
प्रभाग क्रमाक 5 सर्वसाधारण
प्रभाग क्रमाक 6 सर्वसाधारण (महिला) 
प्रभाग क्रमाक 7 सर्वसाधारण
प्रभाग क्रमाक 8 मागास प्रवर्ग (महिला)
प्रभाग क्रमाक 9 सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्रमाक 10 मागास प्रवर्ग 
प्रभाग क्रमाक 11 अनुसुचित जाती (महिला)
प्रभाग क्रमाक 12 अनुसुचित जाती
प्रभाग क्रमाक 13 सर्वसाधारण (महिला) 
प्रभाग क्रमाक 14 सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्रमाक 15 सर्वसाधारण
प्रभाग क्रमाक 16 मागास प्रवर्ग 
प्रभाग क्रमाक 17 मागास प्रवर्ग (महिला),
 यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मोहण पणुरे, शहरप्रमुख सलिम शेख, आरपीआयचे माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत कांबळे, कॉग्रेसचे शहरध्यक्ष के.डी.पाटील, बाळासाहेब पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, दिपक मुळे, माणिक चिकटे, माजी नगरसेवक आयुब शेख, शाम नारायणकर, बाळासाहेब कोरे, दिपक रोडगे, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, विजय ढगे, दत्ता स्वामी, मल्लिकार्जन पाटील, ओम कोरे, चॉद हेड्डे, गोपाळ सुतार, सुरेश वाघ, जे.के.बायस, गोपाळ संदीकर, विजय फावडे, संभाजी सुरवसे, मधुकर भरारे, सतिश माळी, तानाजी घोडके, आदी उपस्थित होते.
 
Top