Views


*लोहारा शहरात भाजपाच्या वतीने ओबीसी जागर अभियान रथ यात्रेचे जंगी स्वागत*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वखाली ओबीसी जागर अभियान रथ यात्रेचे लोहारा तालुका भाजपाच्या वतीने दि.15 नोव्हेंबर रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ओबीसी प्रदेश सचिव पिराजी मंजुळे यांच्या हस्ते ओबीसी जागर अभियान रथ यात्रेचे श्रीफळ फोडून स्वागत करण्यात आले. यावेळी ओबीसी प्रदेश सचिव पिराजी मंजुळे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, माजी नगरसेवक आयुब अब्दुल शेख, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दगडू तिगाडे, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, ओबीसी मोर्चा जिल्हा चिटणीस विजय महानुर, वि‌.का‌.सोसायटी चेअरमन प्रशांत लांडगे, मल्लिनाथ फावडे, संतोष फरिदाबादकर, कल्याण ढगे, महादेव शेवाळे, नागनाथ लोहार, प्रकाश कदम, चनबस जेवळीकर, सुनील पात्रे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top