Views


*कलावंतांनी फक्त स्वातीच्या नक्षत्रा प्रमाणे बरसत रहावे - प्रा.डॉ.गुंडरे*

 कळंब/प्रतिनिधी

कविता हि मानवतेचे गीत गाते. सत्य,शिव,सौंदर्याचा साक्षात्कार घडवत असते.कविता म्हणजे शब्दांची सुंदर गुंफण असते. ती जीवनाच्या विविध क्षेत्रातील गढूळपणा दूर करण्यासाठी हाक देते म्हणून कलावंतांनी फक्त स्वातीच्या नक्षत्रा प्रमाणे बरसात राहावे असे आवाहन प्रा.डॉ.दादाराव गुंडरे यांनी कविसंमेलनाच्या अध्यक्षीय समारोपा प्रसंगी केले.
कळंब न.प कार्यालयासमोरील प्रांगणात कालकथित राम कृष्णाजी कांबळे यांच्या द्वितीय स्मरणार्थ प्रा.डॉ.दादाराव गुंडरे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनाचे आयोजन अविनव साहित्य मंडळाच्या वतीने दिनांक ६ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आले होते.या संमेलनासाठी ज्येष्ठ कथाकार प्रा. भास्कर चंदनशिव, ज्येष्ठ साहित्यिक के.व्ही.सरवदे, रमेश बोर्डेकर,माजी मुख्याध्यापक सी.आर.घाडगे,मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा.श्रीधर भवर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे,अँड.त्रंबक मनगिरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कविसंमेलनात उपनगराध्यक्ष संजय मुंदडा,रमेश बोर्डेकर, शेखर गिरी,प्रा.दत्ता साकोळे,विलास करंजकर,महम्मद चाऊस,डि.के. कुलकर्णी,अलका टोणगे, ज्योती सपाटे, सचिन क्षिरसागर,सुभाष घोडके,माधवसिंग राजपूत,त्रिवेणी कसबे,रोहित करंजकर,महादेवी गोरे आदी कवींनी राजकीय,सामाजिक, कोरोना विषाणू, जाती व धर्म भेद,बाप, मुले-मुली आणि प्रेम आदी विषयाला स्पर्श करणाऱ्या कविता सादर केल्या. अविनाश घोडके यांनी कालकथित राम कृष्णाजी कांबळे या नावाच्या आद्याक्षरावरून त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी कविता शेखर गिरी यांच्या मार्फत सादर केली.
     या संमेलनासाठी प्रा.डॉ.संजय कांबळे, ह.भ.प महादेव महाराज आडसुळ,प्रा. जालिंदर लोहकरे,अनिल हजारे,बी.एल.शीलवंत,
डी.डी.गायकवाड, डॉ.एस.एम.कांबळे, सुनील गायकवाड,अँड.शकूंतला फाटक सह श्रोत्यांची उपस्थिती लक्षणीय होती.संमेलनाच्या प्रस्तावनेतून ज्येष्ठ साहित्यिक के.व्ही.सरवदे यांनी अभिनव साहित्य मंडळाचा चार दशकांचा धावता लेखाजोगा मांडून ग्रामीण साहित्य राज्य आणि देश पातळीवर नेण्याचा संकल्प सोडला.
      या कविसंमेलनाचे बहारदार आणि जोशपूर्ण असे सूत्रसंचालन शेखर गिरी यांनी केले तर आभार सचिन क्षीरसागर यांनी मानले.


 
Top