Views


*तालुकास्तरावर प्रत्येक तिसऱ्या*
*सोमवारी लोकशाही दिन*


उस्मानाबाद/प्रतिनिधी

 तालुकास्तरीय लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजन करण्यात येते. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवशी लोकशाही दिन म्हणून घेण्यात येतो. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमाप्रमाणे लोकशाही दिनाचे आयोजन बंद होते. तथापि, नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी नोव्हेंबर 2021 पासून प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करावे. तसेच या दिनाचे आयोजन करताना सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक यांनी कोविड-19 च्या अनुषंगाने सोशल डिस्टंस चे पालन करणे आवश्यक आहे. तसेच कोविड-19 चा संसर्ग होऊ नये या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे, आदेशांचे पालन करणे बंधनकारक आहे. 

 
Top