Views


*लोहाऱ्यात शिक्षकाचे घर फोडून आठ तोळे सोने चोरट्यांनी केले लंपास*

उमरगा/ प्रतिनिधी


 शहरातील शिक्षकाचे घर फोडून सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी (ता.२२) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

     शहरातील जुन्या तहसील कार्यालयाच्या पाठीमागे जिल्हा परिषदेचे शिक्षक रफिक आयुब शेख यांचे घर असून. गवंडी हे आपल्या कुटुंबासह दोन दिवस लातूर येथे गेले होते. सोमवारी सकाळी कुटुंबासह घरी परतले असता घराच्या दरवाज्याच्या कडी, कुलूप तोडलेले निदर्शनास आले. घरात प्रवेश करून त्यांनी पाहणी केली.असता कपाटाचे दार उघडे होते. यावरून चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी तात्काळ लोहारा पोलीस ठाण्यात माहिती दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे यांच्यासह उपनिरीक्षक आनंदराव वाठोरे पाहणी केली असता. कपाटातील सोन्याचे, गंठण, नेकलेस, कानातील रिंग, व मनी मंगळसूत्र, सोन्याचेचार बांगड्या असे एकूण आठ तोळे सोने लंपास केल्याचे उघड झाले. घटनेची गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे यांनी उस्मानाबाद येथील श्वान पथक, ठसेतज्ञांना पाचरण केले परंतु श्वान पथक काला चोरट्यांचा माग काढता आला नाही
 
Top