Views


*महिला पोलिस अधिकाऱ्याने बेशुद्ध युवकास खांद्यावरून उचलून नेऊन वाचवला जीव*

चेन्नई; वृत्तसंस्था : 


तामिळनाडूत गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसाने अनेक ठिकाणी दाणादाण उडवली आहे. पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच चेन्नईतील एका महिला पोलिस अधिकार्‍याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या महिला अधिकार्‍याने बेशुद्ध युवकाला खांद्यावर उचलून घेत रुग्णालयात पोहोचवले. त्यामुळे या युवकाचा जीव वाचला.

राजेश्वरी असे या महिला पोलिस अधिकार्‍याचे नाव असून त्या पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कृतीने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. राजेश्वरी यांनी सांगितले की, चेन्नईत रस्त्याच्या कडेला एक युवक बेशुद्ध पडल्याचे दिसून आले. या युवकाचे नाव उदयकुमार असे आहे. त्याला तातडीने रुग्णालयात पोहोचविण्याची गरज होती.
वेळेत पोहोचल्याने त्याचा जीव वाचला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आयएएस सुप्रिया साहू यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. साहू यांनी म्हटले आहे की, इन्स्पेक्टर राजेश्वरी यांच्याहून अधिक मजबूत खांदे कुणाचेही नसतील. भर पावसात बेशुद्ध युवकाला उचलून पळवत रिक्षात बसवून रुग्णालयात पोहचवले.


 
Top