Views


*महाराष्ट्रातील जनतेत ला पेट्रोल व डिझेल दरात सूट द्यावी - भाजपाची मागणी*

कळंब/ प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने दिवाळीच्या आधी पेट्रोलवर पाच रुपये तर डिझेल मध्ये दहा रुपये एक्साईज ड्युटी कमी करून जनतेला दिवाळी भेट देत खूप मोठा दिलासा दिला. पेट्रोल दरवाढी साठी राज्य सरकार व घटक पक्ष यांनी या आदी इंधन दरवाढी विरोधात आंदोलने केलेली दिसून आली .परंतु केंद्र सरकारने केंद्रातील करात एवढ्या मोठ्या प्रमाणात सूट दिल्यानंतर ही राज्यानी आजवर व्हॉट करा मधील एकही रुपया कमी न करता पेट्रोल व डिझेल दरवाढीविरोधात केलेले .सर्व आंदोलन केवळ एक राजकीय स्टंट होता हे प्रकर्षाने जाणवून दिले आणि राज्य सरकारला जनतेची कसलीही काळजी नाही. याची प्रचिती करून दिली या उलट जे राज्यांमध्ये भाजपशासित आहेत. त्यांनी केंद्राने एक्साईज ड्युटीड कमी करताच त्यांच्या व्हॉट करांमध्ये सवलत देऊन संबंधित राज्यातील नागरिकांना फार मोठा दिलासा दिला आहे. तरी राज्याच्या मुख्यमंत्र्याने इतर राज्यांचा आदर्श घेत महाराष्ट्रातील जनतेत ला पेट्रोल व डिझेल दरात सूट द्यावी आशयाचे निवेदन आज भारतीय जनता पार्टी कळंब यांच्या कडून तहसीलदार सौ शिंदे मॅडम यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.
यावेळ भाजपाचे तालुकाध्यक्ष अजित दादा पिंगळे, कृषी बाजार समितीचे सभापती रामहरी शिंदे, अरुण काका चौधरी, संजय जाधवर,संतोष कस्पटे,शिवाजी गिड्डे पाटील,संदीप बावीकर, परशुराम देशमाने,सतीश वैद्य,शिवाजी शेंडगे,बाबुराव शेंडगे,विक्रम भंडारे किशोर वाघमारे,इम्रान मुल्ला,सुधीर बिक्कड,जिवा कुचेकर, अशोक क्षीरसागर,अब्दुल मुलानी,सुधाकर थोरबोले,अण्णासाहेब शिंदे व सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top