Views


*बजाज अलाईन्स कंपनीच्या विरोधात राष्ट्रवादीचे काँग्रेस च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली*

उस्मानाबाद / इकबाल मुल्ला

उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना सरसकट 20 हजार रुपये विमा त्वरीत मिळावा, या मागणीसाठी गुरुवारी दि.11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही पध्दतीने राष्ट्रवादीच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहेत. असे राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मंगळवारी (दि.9) रोजी दिली. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे पंचनामे करताना बजाज अलायन्स कंपनीने शेतकर्‍यांकडून पैसे वसूल केले. शेतकर्‍यांना नाहक त्रास दिला. शेतकर्‍यांना धमकावले. त्याच विमा कंपनीने मागील वर्षी पिक विम्याचे जिल्ह्यातील 24 हजार शेतकर्‍यांचे पैसे अद्याप दिलेले नाहीत. त्याचप्रमाणे या वर्षीच्या पिकविम्याचे पैसे कंपनी देण्यासाठी तयार नाही. तरी चालू वर्षासाठी प्रति हेक्टरी 20 हजार प्रमाणे शेतकर्‍यांना विमा त्वरीत वाटप करण्यात यावा, व सदरील विमा कंपनीस ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावे, या मागणीसाठी गुरुवारी दि.11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही पध्दतीने निदर्शने करण्यात आली.
 
Top