Views


*सारोळा गाव हायमास्ट लॅम्पने आणखीन लखलखणार हायमस्टच्या आठ कामाचा थाटात शुभारंभ*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा येथे आठ हायमस्ट लॅम्प उभारणी कामाचा शुभारंभ हभप राजाभाऊ महाराज देवगिरे व ह भ प नवनाथ महाराज चिखलीकर यांच्या हस्ते शनिवारी (दि.6) भाऊबीजच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात करण्यात आला. या सोहळयाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांची प्रमुख उपस्थिती होती. संपूर्ण गाव आणखीन हायमास्ट लॅम्पच्या उजेडाने लखलखणार आहे. सारोळा येथे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या प्रयत्नातून राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून २५-१५ योजनेतून हायमस्ट लॅम्पच्या कामासाठी १० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमधून ८ हायमस्ट लॅम्पची उभारणी करण्यात येत आहे. भाऊबीजेच्या मुहूर्तावर शनिवारी हभप नवनाथ महाराज व ह-भ-प राजाभाऊ महाराज देवगिरे यांच्या हस्ते हायमस्ट लॅम्पच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, ज्येष्ठ नेते, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश (भाऊ) देवगिरे, विद्यमान उपसरपंच भाग्यश्रीताई देवगिरे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्यामसुंदर सारोळकर, दलित मित्र पांडुरंग कठारे गुरुजी, ग्रामपंचायत सदस्य नितीन (दादा) पाटील, बाळासाहेब देवगिरे, तरुण नेतृत्व अमर (बप्पा) बाकले, दत्ता झोंबाडे, छत्रपती रणदिवे, जनक रणदिवे, ह भ प महादेव महाराज देवगिरे, रावसाहेब (आप्पा) मसे, अंकुश रणदिवे, पप्पू गाढवे, धनंजय काळे, सौदागर (बापू) बाकले, सावन देवगिरे, तात्या कुदळे, सी.आर. पीफ. जवान गोरख देवगिरे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष भालचंद्र कठारे, शिवाजी मोहिरे, मुरलीधर कठारे, बंडू रणदिवे, प्रदीप वाघ, दत्तात्रय चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य खंडू शिंदे, पांडुरंग कुदळे, संपत साळुंखे, रामभाऊ कुदळे, जीवन बाकले, भाऊ बाकले, ज्योतीराम रणदिवे, विजय मोहिरे, रमेश देडे, शशिकांत परीट, प्रकाश रणदिवे, पांडुरंग रणदिवे, शैलेश शिंदे, गणेश कोळगे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top