Views


*लोहारा शहरातील प्रभाग 7 मध्ये शिवसेनेच्या नगरसेविका श्रीमती कमल भरारे यांच्या पाठपुराव्यामुळे विद्यूत खांब (लाईट पोल) बसविण्यात आले*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा शहरातील प्रभाग क्रं. 7 मधील कांही भागात विद्यूत खांब (लाईट पोल ) ची आवश्यकता होती. त्या अनुषंगाने उमरगा लोहारा तालुक्याचे आ.ज्ञानराज चौगुले यांच्या सहकार्याने, युवानेते किरण भैय्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने या प्रभागातील शिवसेनेच्या नगरसेविका श्रीमती कमल राम भरारे यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रभागात दि.6 नोव्हेंबर रोजी विद्यूत खांब बसविण्यात आले. यामुळे नागरिकांतुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या प्रभागातील 15 ते 16 घरांना चारशे ते पाचशे मिटर वरुन लाईट कनेक्शन होते. या भागात विद्युत पोल बसविल्याने या नागरीकांना याचा फायदा होणार आहे. या प्रभागातील नगरसेविका श्रीमती कमल राम भरारे यांनी निवडणुकीच्यावेळी येथील नागरीकांना पोल बसविण्यात येईल असे आश्वासन दिले होते. या आश्वासाधाची त्यांनी पूर्तता केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
 
Top