Views


 *कोथळ्यातील तरूणाची एक लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक!*


कळंब/प्रतिनिधी

  तालुक्यातील कोथळा येथील एका इसमाची एक लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना घडली असून, फसवणूक झालेल्या ईसमाच्या तक्रारीवरुन शिराढोण पोलीस स्टेशनमध्ये फसवणूकीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     याबाबत सविस्तर वृत्त असे की,कोथळ्यातील श्रीकृष्ण देविचंद हुंबे यांना दि. २० नोव्हेंबर २०२१ रोजी ९.३० वा. सु. टपालाद्वारे एक स्क्रॅच कार्ड व विनिंग कार्ड मिळाले. यावर हुंबे यांनी त्या कार्डवरील फोन क्रमांकावर संपर्क साधला असता त्या समोरील अज्ञात व्यक्तीने, तुम्हाला ११,००००० रूपये बक्षीस लागले असून, बक्षीसाची रक्कम जमा करण्यासाठी टिडीएस रक्कम, जीएसटी रक्कम, एनओसी इत्यादीसांठी १,००,०००० रूपये रक्कम भरा. असे हुंबे यांना सांगीतले. यावर हुंबे यांनी काही एक विचार न करता त्या अज्ञात व्यक्तीने सांगीतलेल्या बँक खात्यात युपीआय प्रणालीद्वारे ती रक्कम भरली. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे हुबे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी शिराढोण पोलीस ठाणे येथे दि. २१ नोव्हेंबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता कलम कलम- ४२० सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- ६६ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 
Top