Views


*१५ तोळे सोन्यासह ७ लाख रुपयांवर चोरट्यांनी मारला डल्ला*

*उस्मानाबाद शहरात भर वस्तीत मोठी चोरीची घटना घडल्याने भिती चे वातावरण*


उस्मानाबाद/प्रतिनिधी

शहरातील गणेश नगर भागात झालेल्या चोरीमध्ये १५ तोळे सोन्यासह सात लाख रुपयांचे मुद्देमाल चोरीस गेल्या ची घटना घडली असून.
    यामुळे या घटना या भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे लातूर येथील संजय सौदागर हे त्यांचे पत्नी मुली सह उस्मानाबाद येथील त्यांचे मेहुणे बालाजी जठार यांच्या घरी गडंगण जेवण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी सोलापूर येथे खरेदी करून रात्री जठार यांच्या घरी मुक्काम केला.यावेळी ९ नोव्हेंबर रोजी रात्री तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दरवाजाच्या आतील लोखंडी रॉडने तोडून घरातील पर्स चोरून नेली 

    यामध्ये ९१००० रुपये किमतीचे दोन सोन्याचे लॉकेट १ लाख १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट १ लाख १५ हजार रुपयांचे सोन्याचे नेकलेस, सोन्याचे पेंडल, लक्ष्मीहार, कानातील कुंडल, सोन्याची नथ, नाकातील मोरणी, चांदीचे मेकल असे १५ तोळे सोन्यासह ७ लाख रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
    या प्रकरणी संजय सौदागर यांनी दिलेल्या तक्रारीवरून उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून .पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक शंकर सुर्वे करीत आहेत. या घटनेनंतर उस्मानाबाद पोलीस घटनास्थळी भेट देऊन पाहणी व चौकशी केली. तसेच श्वानपथक ही प्राचरण केले.मात्र चोरट्यांचा माग काढण्यात श्वानपथक असमर्थ ठरला चोरट्यांन पर्यंत पोहोचले नाही.भरवस्तीत भागात मोठी चोरी झाल्या नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
 
Top