*सोशल मीडियावर पसरवण्यात येणाऱ्या बातम्या चुकीच्या आणि बनावट असुन सोशल मीडिया वर होत असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नये -- प्रभारी पो.नि.रंगनाथ जगताप*
उस्मानाबाद/प्रतिनिधी
त्रिपुरातील हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. राज्यातील अमरावती, मालेगाव, नांदेड यासह अनेक शहरांत याचे पडसाद उमटले आहे. राज्यात काही ठिकाणी मोर्चाला हिंसक वळण लागले आहे. त्रिपुरातील जातीय हिंसाचाराच्या घटना समोर आल्या. त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रात मुस्लिम संघटनांकडून अनेक भागांत बंद पाळण्यात आले. सोशल मीडियावर पसरवण्यात येणाऱ्या बातम्या चुकीच्या आणि बनावट आहेत. सोशल मीडियावरुन लोकांची दिशाभूल पोस्ट वायरल होत आहेत. त्यानिमित्त सोशल मीडिया वर होत असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन लोहारा पोलीस ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक रंगनाथ जगताप यांनी केले आहे. लोहारा पोलीस ठाण्यात याबाबत दि.14 नोव्हेंबर रोजी शांतता बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी लोहारा शहर व तालुक्यातील नागरिकांनी शांतता ठवेवावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी अभिमान खराडे, आयुब अब्दुल शेख, शब्बीर गवंडी, अविनाश माळी, इकबाल मुल्ला,
आयुब हबीब शेख, दिपक रोडगे, आरिफ खानापुरे, कमलाकर सिरसाट,, यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.