Views


*आ.ज्ञानराज चौगुले यांनी स्थानिक आमदार निधीतून लोहारा शहरासाठी 11 विंधन विहीर व अंतर्गत विद्युतीकरणसाठी निधी दिल्याने नागरीकांतुन समाधान*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


उमरगा, लोहारा तालुक्याचे आ.ज्ञानराज चौगुले यांनी लोहारा शहरातील प्रभागातील नागरिकांना पाण्याची सोय व्हावी, यासाठी आपल्या स्थानिक आमदार निधीतून एकुण 11 विंधन विहीर बोअरसाठी 22 लाख रुपये व तसेच प्रभाग क्रं. 10 मधील विद्युत पोल व विद्युत तारा ओढण्यासाठी 6 लाख रुपये निधी मंजूर केल्याचे शहरातील नागरिकांतुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे. लोहारा शहरातील प्रभाग क्र.1 मध्ये 1, प्रभाग क्रं. 2 मध्ये 1, प्रभाग क्रं.5 मध्ये 2, प्रभाग क्रं.7 मध्ये 2, प्रभाग क्रं.9 मध्ये 1, प्रभाग क्रं.10 मध्ये 1, प्रभाग क्रं.11 मध्ये 1, प्रभाग क्रं.17 मध्ये 2 असे एकूण 11 विंधन विहिर बोअर मंजुर करण्यात आली आहेत. लोहारा शहरातील प्रभाग क्रं.2 व 17 मध्ये विंधन विहीर बोअरचे भुमिपुजन दि.14 नोव्हेंबर रोजी माजी नगरसेवक अबुल फराह कादरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक अभिमान खराडे, जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, माजी पं.स.सदस्य दिपक रोडगे, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, भरत सुतार, हामिद पठाण, बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष आयुब शेख, दिपक प्रकाश रोडगे, रमेश रोडगे, तात्या पडवळ, दयानंद शिंदे, शहेबाज सय्यद, खुनमिर मोमिन, मिजास चाऊस, नयुम पठाण, रवि पवार, सद्दाम फुटाणकर, ईलाई फुटाणकर, बालाजी पडवळकर, संभाजी सुरवसे, नाना वाघ, ज्ञानेश्वर काडगावे, अमोल माळी, शंकर झिंगाडे, शिवा सुतार, लक्ष्मण सुतार, विश्वेश्वर सुतार, यांच्यासह दोन्ही प्रभागातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top