*कन्हेरवाडी फाट्यावर चोरट्यांकडून लूटमार*
कळंब/प्रतिनिधी
तालुक्यातील कन्हेरवाडी फाटा येथे दुचाकी आडवून अज्ञाताने लाथा बुक्या सह काठीने बेदम मारहाण करून दागिने तसेच रोकड लाविले या प्रकरणी अज्ञात विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की कळंब येथील नामदेव रामकृष्ण शिंदे हे 11 नोव्हेंबर रोजी रात्री दुचाकीवरून जात होते. त्यांची दुचाकी कन्हेरवाडी फाटा येथे आली असता. त्यांना फोन आला त्यामुळे दुचाकी त्यांनी रस्त्याच्या बाजूला घेऊन थांबविली आजूबाजूला दुसरे कोणीही नसल्याची संधी साधत अज्ञात चार अनोळखी पुरुषांनी नामदेव शिंदे यांना लाथाबुक्क्यांनी तसेच काठीने बेदम मारहाण केले यानंतर त्यांच्या बोटातील 12 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी तसेच खिशातील 13 हजार रुपये हिसकावून अज्ञात चार ही जण घटनास्थळावरून पसार झाले
या नंतर शिंदे यांनी दुसऱ्या दिवशी कळंब पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भा दं सं चे कलम 394 34 गुन्हा नोंद करण्यात आला. अधिक तपास पोलीस करीत आहेत