Views


*चोरीच्या मोबाईल सह दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात*


उस्मानाबाद/ प्रतिनिधी 

 चोरीचा मोबाईलसह हा दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे दोघांना बेड्या ठोकल्या ही कारवाई 9 नोव्हेंबर रोजी करण्यात आली.संबंधित दोघांनाही पुढील तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
   याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा येथील इरफान शेख यांच्यासह गावातील सात व्यक्ती शेतातील पत्र्याच्या शेड समोर झोपले होते. ही संधी साधून त्यांच्याकडील सात स्मार्टफोन अज्ञात व्यक्तीने चोरून नेले या प्रकरणी शेख यांच्या फिर्यादीनुसार बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान चोरीच्या या प्रकरणाचा तपास सुरू असताना उस्मानाबाद सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक किरवाडे यांच्या पथकाने तांत्रिक अभ्यास केला. या गुन्ह्यातील चोरीस गेलेले स्मार्टफोन पैकी दोन स्मार्टफोन हे उस्मानाबाद शहरातील सांजा रोड येथील सुरज बजरंग विषय व संतोष गोवर्धने धोत्रे यांच्याकडे असल्याचे निदर्शनास आले.
      या प्राप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल सुनील मोरे यांनी सांजा रोड संबंधित दोघांना चोरीच्या मोबाईल सहज ताब्यात घेतले पुढील तपासासाठी दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 
Top