Views


*कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ उस्मानाबाद यांच्या समवेत जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक जि प उस्मानाबाद यांची बैठक संपन्न*

भूम /प्रतिनिधी

सविस्तर वृत्त असे की , माननीय मा.शिक्षणाधिकारी साहेब माध्यमिक जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या दालनात शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी यांचें विविध प्रश्नांवर चर्चा करून प्रश्र्न निकाली काढण्यासाठी शासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेचे मा.विजय बांगर साहेब,कास्टृईब् महासंघाचे राज्य उपाध्यक्ष मा.बाबासाहेब जानराव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य कास्टृईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे, जिल्हा शाखा उस्मानाबाद ची बैठक आयोजित करण्यात आली होती बैठक मध्ये कर्मचाऱ्यांची दुय्यम सेवापुस्तिका, रोखीने मिळणारा् थकित सातवा वेतन आयोग फरक पहिला हप्ता, भविष्य निर्वाह अग्रीम देणे साठी मागणी प्रस्ताव शासनाकडून निधी ची तात्काळ मागणी करुन कर्ज मागणी प्रस्ताव निकाली काढण्यात यावेत अशा अनेक विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली मा.बांगर साहेब यांनी अभ्यासपूर्ण योग्य असे मार्गदर्शन केले.बैठकीस पे यूनिट अधिक्षक मा. पवार साहेब जिल्हा अध्यक्ष सुनिल मुंढे, कार्याध्यक्ष बसवंत सुर्यवंशी, जेष्ठ उपाध्यक्ष सुनील लोंढे, महिला अध्यक्ष सौ.शांता भातलवंडे – धोतरकर, संघटन सचिव सुरेश चव्हाण,पोळ सर इतर सर्व जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.शेवटी महासंघाचे जिल्हा महासचिव मुकूंद रायखेलकर सर यांनी आभार मानले बैठक खेळीमेळीच्या वातावरणात चहा पानानंतर संपन्न झाली.
 
Top