Views


*सास्तुर जि.प.मतदार संघात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील व जि.प.सदस्या शितलताई यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भुमिजन*

उस्मानाबाद/प्रतिनिधी


लोहारा तालुक्यातील सास्तुर जि.प.मतदार संघातील तावशीगड, सालेगाव, तोरंबा, करवंजी, आदि ठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील सास्तुरकर व जि.प.सदस्या शितलताई पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भुमिजन दि.15 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. येथील विविध विकास कामांचे भुमीपूजन झाल्याने नागरीकांतुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे. लोहारा तालुक्यातील 1) तावशीगड ते करजगाव - डांबरीकरण 20 लक्ष 2) तावशीगड ते तोरंबा - डांबरीकरण 11लक्ष 3) चिरकापाटी पाईपलाईन-3 लक्ष, 4) सालेगाव उ. नागोबा मंदिर ते तोरंबा डांबरीकरण - २५ लक्ष, 5) तोरंबा जुने ते करवंजी डांबरीकरण -10 लक्ष रुपये इतका निधी मंजूर करुन घेतला आहे. यावेळी तावशीगड ग्रामसेवक एस.जे मोरे, ग्रामसेवक एन. बी. भोरे, राजपाल पाटील, दयानंद थोरात, लक्ष्मण बिराजदार, राम मिटकरी, वसंत चंडकाळे, महेश घोटाळे, सालेगाव येथील नारायण गुरव, मुरली पाटील, व्यंकट बडूरे, गोविंद बापू बिराजदार, कमलाकर देशपांडे, प्रवीण गोरे, तोरंबा येथील व्यंकट रणखांब, दादासाहेब रनखांब, नामदेव मातोळे, मधुकर बिराजदार, प्रकाश चव्हाण, वसंत कोरे, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी राहुल पाटील व जि.प.सदस्या शितलताई पाटील यांनी कामे उत्तम दर्जाची कामे करुन घ्या, असे संबंधित अधिकाऱ्यांना सूचित केले.
 
Top