Views


*उमरगा शहरात भाजपाच्या वतीने ओबीसी जागर अभियान रथ यात्रेचे जंगी स्वागत*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

महाराष्ट्र राज्यातील ओबीसी चे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने त्याचा निषेध करावा आणि तात्काळ राज्यात ओबिसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वखाली ओबीसी जागर अभियान रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा वतीने राज्यात सरकारला जाग यावी म्हणून ही ओबीसी जागर अभियान आयोजित करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने उमरगा शहरांतील शासकीय विश्रामगृह येथे ओबीसी जागर अभियान रथाचे स्वागत करून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भारतीय जनता ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे, जिल्हा सरचिटणीस माधव पवार, भाजपा तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, सुनिल काका कुलकर्णी, सरचिटणीस सिद्धेश्वर माने, महिला मोर्चा अध्यक्षा सुलोचना वेदपाठक, नगरसेवक अमर वरवटे, ईराप्पा घोडके, महादेव सलके, राम लवटे, किरण रामतीर्थे, शुभम मुळजकर, चेतन पवार, अजय वेदपाठक, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top