Views


*नगरपरिषद निवडणूक-उस्मानाबाद जिल्ह्यातील या पालिकेत राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा...*

उस्मानाबाद:-(प्रतिनिधी)


जिल्ह्यातील उस्मानाबाद, कळंब व तुळजापूर यातील नगर परिषदेच्या बाबतीत झालेल्या आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा स्वबळाचा आग्रह असल्याने कार्यकर्ते यांच्या मागणीनुसार स्वबळावर भर दिला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दिली. पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या नगरसेवक पदाधिकारी यांचे निलंबन करून लवकरच पक्षात साफसफाई मोहीम हाती घेतली जाणार असून पक्षनिष्ठा कार्यकर्ते पदाधिकारी यांना संधी दिली जाणार आहे असे ते म्हणाले.
तुळजापूर नगर परिषदेच्या नगरसेवकांना राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात काम केल्याने सहा वर्षाकरिता पक्षातून निलंबित करण्यात आले आहे हा निर्णय त्याच दृष्टीने घेतला असून पक्षविरोधी काम केलेल यांना पक्षातून काढले जाणार आहे तीन तालुक्यातील पदाधिकारी यांची बैठक झाली असून आगामी काळात उर्वरित तालुक्यात बैठक लवकरच होणार आहे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा निरीक्षक रमेश बारस्कर यांच्या बैठकीत पक्षाच्या कार्यकर्ते यांनी स्वबळाचा आग्रह धरला असून त्याप्रमाणे तयारी व मोर्चेबांधणी सुरू आहे राज्यात महा विकास आघाडी असली तरी पक्ष वाढ व विस्तारासाठी प्रत्येक पक्ष तयारी करीत असतो असे ते म्हणाले उस्मानाबाद जिल्ह्यात स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी पक्षाची शिवसेना पक्षाशी थेट स्पर्धा आहे गाव व स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षात आमने-सामने असतात त्यामुळे आगामी नगरपरिषद निवडणुकीत कार्यकर्त्यांचा सोहळा चा हा ग्रह आहेत कार्यकर्ते सोबतच पदाधिकारी व जिल्हास्तरीय नेतेही स्वबळावर ठाम आहेत असे बिराजदार म्हणाले.
 
Top