Views


*अज्ञात वाहनचालकाबाबत माहिती देण्याबाबत*
*आंबी पोलिस ठाण्याचे आवाहन*
 
उस्मानाबाद/प्रतिनिधी 

 परंडा तालुक्यातील शेळगाव येथील सुरेश मोहन उबाळे, वय 40 वर्षे यांना दि.10 ऑगस्ट 2021 रोजी अनाळा ते आंबी जाणारा राज्य रस्ता मार्ग क्र.210 येथील पालखी मार्गाजवळ एका अज्ञात वाहनचालकाने निष्काळजीपणाने वाहन चालवून जोराची धडक दिली. त्यामध्ये सुरेश उबाळे हे गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना उपचाराकरिता परंडा येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना दि.11 ऑगस्ट 2021 रोजी सोलापूर येथे दाखल करण्यात आले. सोलापूर येथे उपचारादरम्यान त्यांचे दि.12 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 11.00 वाजता निधन झाले. त्यावरुन त्या अज्ञात वाहनचालक विरुध्द आंबी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
          तरी त्या अज्ञात वाहनचालकाबाबत कोणास काही माहिती प्राप्त असल्यास त्यांनी अंबी पोलिस ठाणे येथील  (02478)271033, 7020506652 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अंबी पोलिस ठाण्यामार्फत करण्यात आले आहे.

 
Top