Views


*आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर- उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी व लोहारा नगरपंचायतीच्या निवडणुकीची तयारी* 

*असा असेल आरक्षण सोडत कार्यक्रम* 

उस्मानाबाद/प्रतिनिधी

   जिल्ह्यातील वाशी व लोहारा या दोन नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 12 नोव्हेंबर रोजी मुख्याधिकारी आरक्षण सोडत कार्यक्रम राबवितील वाशी नगरपंचायत ची मुदत 24 जानेवारी 2021 तर लोहारा पंचायतीची मुदत 6 मे 2021 रोजी संपली आहे या निवडणूक व आरक्षण सोडतीसाठी 1 नोव्हेंबर 2021 मतदान यादी ग्राह्य धरली जाणार आहे एप्रिल 2021 ते मे 2021 या कालावधीत मुदत संपलेल्या राज्यातील 86 नगरपंचायत मधील सदस्य पदाच्या नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून याबाबतचे आदेश निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी काढले आहेत उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी व लोहारा नगरपंचायतीच्या सदस्य पदाचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून या सोडत कार्यक्रमानुसार 12 नोव्हेंबर रोजी शुक्रवारी नगरपंचायतीच्या सदस्य पदाचा आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे.यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला आरक्षण काढण्यात येणार आहे. या आरक्षणानंतर 12 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर या काळात हरकती व सूचना मागविण्यात येणार असून त्यावर 17 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी होणार आहे. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन संबंधित विभागाचे आयुक्त यांच्याकडे जिल्हाधिकारी 18 नोव्हेंबर रोजी आपला अहवाल सादर करतील 22 नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षणास आरक्षण मान्यता देण्यात येणार असून 23 नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षणाबाबत आदी सूचना वृत्तपत्र स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपंचायतीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
 
Top