Views


*वाशी शहरात चोरट्यांचा हैदोस महिलांना मारहाण करून १५ तोळे सोन्यावर डल्ला*

*शहरवासीयांना ची पोलिस प्रशासनावर संताप व्यक्त करत असुरक्षितेच्या चिंतेत*


वाशी /प्रतिनिधी


शहरातील जिजाऊ नगर भागात ज्ञानेश्वर रावसाहेब बोंद्रे हे कुटुंबासह राहतात 19 नोव्हेंबर रोजी रात्री जेवण करून पत्नी सुमन व सून  शुभांगी अक्षय उंदरे  हे एका खोलीत झोपले होते. ज्ञानेश्वर हे हॉलमध्ये झुपले असता 20 नोव्हेंबर च्या पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पत्नी व सुनेचे आरडाओरड करत असल्याचा आवाज आला त्यामुळे त्यांच्या रूमकडे जाण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता त्याला बाहेरून कडी लावल्याचे उंदरे यांच्या लक्षात आले हॉलच्या समोरील बाजूस दरवाजा उघडून त्यांनी पाठीमागे जाऊन पाहिले असता एका अज्ञात चोरटा हातात काठी व धारदार शस्त्र घेऊन उभा होता. उर्वरित दोघेजण दोघींना मारहाण करीत होते. चोरट्यांनी काही दागिने आहेत ते द्या म्हटल्यावर त्यांनी हातातील पाटल्या व इतर मौल्यवान दागिने दिले यानंतर चोरट्यांनी पाठीमागच्या दरवाजातून पवार केला. चोरट्यांनी सुमन उंदरे यांच्या  गळ्यावर धारधार शस्त्राने
वार केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या व शुभांगी उंदरे यांना हातावर लाकडाचा मार लागल्याने गंभीर मार लागला आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या घडणेची नोंद वाशी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. मागील काही महिन्यात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. शहरवासीयांना ची पोलिस प्रशासनावर संताप व्यक्त करत असुरक्षितेच्या चिंतेत

 
Top