Views


*तोतया कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यास 50 हजाराला लुटले*


उस्मानाबाद /प्रतिनिधी 


कृषी अधिकारी असल्याची बतावणी करत एका 72 वर्षे वृद्ध शेतकरी अज्ञात भामट्याने सुमारे 50 हजार रुपयाचा गंडविले ही घटना 18 नोव्हेंबर रोजी लोहारा तालुक्यातील बेंडकाळ येथे घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की एका अनोळखी व्यक्तीने "मी उस्मानाबाद येथे कृषी अधिकारी असून तुमचे सिंचन साहित्य अनुदान आले आहे" त्यासाठी तुम्हाला 50 हजार रुपयांचे चलन भरावे लागेल अनुदान मिळाल्यास तुमच्या चलनाची रक्कम तुम्हाला परत मिळेल अशी येथील 72 वर्षीय शेतकरी राम साधु कदम यांना 18 नोव्हेंबर रोजी बतावणी केली.यानंतर काही एक विचार न करता राम कदम यांनी त्याच्या कारमध्ये बसून अनोळखी व्यक्ती आपल्या घरी नेले. 

 यानंतर कदम यांनी चलनाची रक्कम म्हणून त्या व्यक्तीस 50 हजार रुपये दिले यावर त्या व्यक्तीने ऑनलाईन भरण्याची खात्री दिली. व अनुदानाच्या रकमेचा धनादेश उद्या घेऊन येतो. असे कदम यांना खात्री पटवून दिले एवढेच नाही तर तोतया कृषी अधिकाऱ्यांनी आपला मोबाईल क्रमांक हे कदम यांना दिला यानंतर कदम यांनी संबंधित फोन नंबर वर संपर्क साधला असता तो बंद आला. वारंवार प्रयत्न करूनही काहीच उपयोग झालेला नाही त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वृद्ध शेतकरी कदम यांनी लोहारा पोलिस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली त्यानुसार अज्ञात विरुद्ध 19 नोव्हेंबर रोजी 170, 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलिस करीत आहेत
 
Top