Views


*कळंब येथे पोलीस कर्मचाऱ्याकडून प्रामाणिकतेचं प्रत्यय*

कळंब/प्रतिनिधी


कळंब पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक (वाहतूक निरीक्षक) फरहान पठाण यांच्याकडून प्रामाणिकपणाचे उदाहरण पाहायला मिळाले.

सोमवारी कळंब येथे आठवडी बाजार भरत असतो. खरेदीसाठी आजूबाजूच्या गावातील लोक कळंबमध्ये दाखल होत असतात. असेच बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील सोनेसांगवी येथील अप्पासाहेब यादव हे आपल्या कामानिमित्त कळंब येथे आले होते. 
यादरम्यान यादव यांचे पैशाचे पाकीट हरवले. त्यात ७ हजार रुपये आणि काही महत्वाचे कागदपत्रे होती. पाकीट कुठेच सापडत नसल्याने निराश होऊन अप्पासाहेब यादव आपल्या गावी निघून गेले.

 मात्र कळंब पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक फरहान पठाण हे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपले वाहतूक चे कर्तव्य बजावत असताना त्यांना पैशाचे ते पाकीट सापडले. पाकीट निहाळलं असता त्यात सात हजार रुपये, ए.टी.एम. कार्ड्स व इतर महत्वाचे कागदपत्रे होती. 

त्यावरून पठाण यांनी वेळ न घालवता यादव यांचा संपर्क क्रमांक काढून त्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून बोलावून घेतले. आणि पैशाचे पाकीट त्यांच्याकडे सुपूर्द केले. यादरम्यान अप्पासाहेब यादव यांनी पोलीस कर्मचारी पठाण यांचे आभार मानले. तर माणुसकीचे दर्शन घडवणारे फरहान पठाण यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
Top