*राष्ट्रवादीचे विमा कंपनी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, नुकसानग्रस्त शेतकर्यांना 20 हजार द्या, विमा कंपनीस ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची मागणी*
उस्मानाबाद/प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्यांना सरसकट 20 हजार रुपये विमा त्वरीत मिळावा, या मागणीसाठी गुरुवारी दि.11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली विमा कंपनी विरोधात शेतकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे पंचनामे करताना बजाज अलायन्स कंपनीने शेतकर्यांकडून पैसे वसूल केले. शेतकर्यांना नाहक त्रास दिला. शेतकर्यांना धमकावले. त्याच विमा कंपनीने मागील वर्षी पिक विम्याचे जिल्ह्यातील 24 हजार शेतकर्यांचे पैसे अद्याप दिलेले नाहीत. या वर्षीच्या पिकविम्याचे पैसे कंपनी देण्यासाठी तयार नाही. त्यामुळे चालू वर्षासाठी प्रति हेक्टरी 20 हजार प्रमाणे शेतकर्यांना विमा त्वरीत वाटप करण्यात यावा, व सदरील विमा कंपनीस ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते संजय निंबाळकर, गुणवंतराव पवार, विलास गाडे, अॅड. प्रविण शिंदे, प्रा. तुषार वाघमारे, नानासाहेब जमदाडे, बालाजी डोंगे, इकबाल पटेल, भारत शिंदे, सागर चिंचकर, अरुण पवार, अतुल कोल्हे, शंकर वाघमारे, अॅड. तुकाराम शिंदे, अमर देशमुख, रमेश देशमुख, आकाश जाधव, दिपक माळी, अबरार काझी, अॅड राजु कसबे, असलम पठाण, मोहसिन काझी, भगवान पवार, रमेश शिंदे, शशिकांत राठोड, नामदेव चव्हाण, पिंटु शेळके, औदुंबर धोंगडे, अप्पा पडवळ, दौलत गाढवे, सुदर्शन करंजकर, तेजस भालेराव, नाना पवार, शरद रितापुरे, सतीश माने, सचिन शेळके, बब्रुवान वाकुरे, भास्कर काटे, सतीश शितोळे, हनुमंत गरड, उत्रेश्वर धाबेकर, रामभाऊ कसबे, रमेश गादेकर, रमेश गडकर, उमेश डोके, दत्तू पाटील, अश्रुबा पवार, दिनकर डोंगरे, अशोक शिंदे, बाळासाहेब जाधव, अनिल जाधव, प्रशांत फंड, मसुद काझी, सुधीर लोमटे, बालाजी बारकुल, राजाभाऊ निचळे, विनायक कवडे, बालाजी गायकवाड, महेश पवार, दयानंद गायकवाड, बांदल झोंबाडे, दत्तू वाघमारे, सुधाकर गायकवाड, शाहुराव खोसे, माणिक जाधव, रामहारी रितापुरे, शरद काळे, सुदर्शन माने, गणपत चव्हाण आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------------------------------------------------------------
त्वरीत विमा न दिल्यास राष्ट्रीय महामार्ग रोखणार : संजय दुधगावकर
जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्यांना सरसकट 20 हजार रुपये विमा त्वरीत मिळावा, पंचनामे करताना बजाज अलायन्स कंपनीने शेतकर्यांकडून पैसे वसूल केले. शेतकर्यांना नाहक त्रास दिला. शेतकर्यांना धमकावले. त्याच विमा कंपनीने मागील वर्षी पिक विम्याचे 24 हजार शेतकर्यांचे पैसे अद्याप दिलेले नाहीत. या वर्षीच्या पिकविम्याचे पैसे कंपनी देण्यासाठी तयार नाही. त्यामुळे सदरील विमा कंपनीस ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावे, या मागणीसाठी हे निदर्शने आंदोलन करण्यात आले आहे. या मागण्या मान्य न झाल्यास यापुढे राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन करुत असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी दिला आहे.