Views


*डेबीटकार्ड बदलून 87 हजार रुपये लबाडले*


उस्मानाबाद/ प्रतिनिधी

मदतीचा बहाणा करत डेबीटकार्ड मध्ये बदल करून 87 हजार रुपये काढून फसवणूक केली. या प्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद झाला.

या बाबत अधिक माहिती अशी की दगडू घोडके रा. नळदुर्ग ता.तुळजापूर आणि पांडुरंग शिवमुर्ती भुजबळ हे आठ नोव्हेंबरला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास नळदुर्ग येथील एसबीआय एटीएम मध्ये डेबीटकार्डद्वारे पैसे काढत होते .यावेळी त्या दोघांना पैसे काढण्यास अडचण येत असल्याचे पाहून तेथे असलेले एक अनोखी पुरुषांनी मदतीचा बहाणा करून त्या दोघांचे डेबीटकार्ड घेतले त्यांना त्याच डेबिट कार्डच्या रंगसंगती चे दुसरी डेबीटकार्ड दिले.

   या नंतर चार वाजण्याच्या सुमारास घोडके यांना त्यांच्या बँक खात्यातून 49 हजार 888 रुपये कपातीचा मेसेज आला. तर भुजबळ यांना त्यांच्या बँक खात्यातून 37 हजार 300 रुपये कपातीचा मेसेज प्राप्त झाला. या सर्व प्रकाराने त्यांचे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने याप्रकरणी नळदुर्ग पोलिस आणि पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
 
Top