*चार चोरट्यांना ताब्यात घेत दहा विद्युत मोटारी केल्या जप्त*
*उमरगा पोलिसाची धाडसी कार्यवाही*
उमरगा/ प्रतिनिधी
तालुक्यामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून विद्युतपंपासह केबल व स्टाटर चोरीच्या घटना घडत आहेत. या नुसार पोलिसांकडे तक्रारी प्राप्त ऊ होत्या दरम्यान चार दिवसात पोलिसांनी पाच चोरट्यांकडून दहा विद्युत पंप व साहित्य जप्त करून गुन्हा नोंद केला आहे
सात ते आठ नोव्हेंबर दरम्यान त्रिकोली शिवारात चंद्रकांत वैजिनाथ सुरवसे यांच्या विहिरीतील पाणबुडी मोटार चोरीला गेल्याची घटना घडली होती. याबाबत 10 नोव्हेंबर उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी विकास दूधभाते यास अटक केली होती. तर उर्वरित चोरट्यांचा शोध सुरू असताना. अब्बास माडजे याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत सचिन कोळी यांचे नाव समोर आल्याने त्यालाही अटक करण्यात आली .14 नोव्हेंबर रोजी कृष्णा सुरवसे, प्रेमनाथ सुरवसे या दोघांना अटक करण्यात आली उमरगा पोलिसांनी चार दिवसात पाच चोरट्यांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करतात त्यांच्याकडून 10 विद्युत पंपा सह साहित्य जप्त केले आहे सदर घटनेचा तपास पोलिस नाईक प्रताप बांगर करत आहेत