Views


*49 ग्राम सोन्याचे दागिने,16 स्मार्टफोन, दुचाकी जप्त, दोन चोरटे अटक*


उस्मानाबाद/ प्रतिनिधी

जिल्ह्यातील विविध ठिकाणी चोरी घरफोड्यातील चोरीस गेलेले 49 ग्राम सोन्याचे दागिने,16 स्मार्टफोन, दुचाकी जप्त करून पोलिसांनी दोघा दोघांना ताब्यात घेतले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून

जिल्ह्यातील उस्मानाबाद,ढोकी, येरमाळा पोलीस ठाण्याहद्दीत घडलेल्या चोरी घरफोड्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाचे रविवारी (28) गस्ती दरम्यान उस्मानाबाद येथील अजय श्रावण शिंदे व सुनील श्रावण शिंदे उर्फ काळ्या हे दोघे काही दिवसापासून चोरीचे मोबाईल व दुचाकी संशय रित्या बाळगून आहेत. याची माहिती पथकाला मिळाली होती . पथकाने दोघांनाही ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या घरावर छापा मारला. पोलिसांची चाहूल लागताच दोघेही पळून जाण्याचा प्रयत्न केला. पथकाने दीड किलोमीटर पाठलाग करून दोघांनाही पकडून त्यांच्याकडून 49 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक दुचाकी, व 16 स्मार्टफोन जप्त केले सदर जप्त केलेले मुद्देमाल ची तपासणी केली असता सदर मुद्देमाल हा चोरीचा असल्याचा निष्पन्न झाले जिल्ह्यातील ढोकी ,उस्मानाबाद ग्रामीण ,येरमाळा येथील दरोडा व सोलापूर जिल्ह्यातील येथील पोलिस ठाण्याच्या आरोपी असल्याचे समजले

सदरची कारवाई ही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश पवार, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग माने, पोलीस हेडकॉन्स्टेबल महेबुब अरब, पोलिस नाईक हुसेन सय्यद, आमोल चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र आरसोड, अविनाश मरलापल्ले, अशोक ढगारे,बबन जाधवर, साईनाथ असमोड,आंनद गोरे यांनी केली.


 
Top