Views


*25 महिलासह 64 पुरुष डान्सबारमधुन  ताब्यात उस्मानाबाद पोलीसांची कारवाई*


उस्मानाबाद प्रतिनिधी

जिल्ह्यातील तुळजापूर येथील नळदुर्ग रोडवरील हॉटेल गजगा या डान्सबारवर उस्मानाबाद पोलिस दलाच्या विशेष पथकाने छापा टाकून 25 महिलासह 64 पुरुष, 2 मॅनेजर  बार बालक यांना अटक केली आहे. उस्मानाबाद पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने ही कारवाई करण्यात आली . कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी एम रमेश व तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

तुळजापूर येथील गजगा डान्सबार सुरू झाल्यानंतर ही पहिलीच मोठी कारवाई आहे. यात 25 महिला व 64 पुरुष यांना अटक करण्यात आली आहे. सर्व महिला हे परराज्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे तर ग्राहक असून ते सोलापूर, गुलबर्गा, कर्नाटक, राज्यासह अन्य भागातील आहेत.

डान्सबारमध्ये विभतस वर्तन करणे यासह रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवणे यासह इतर कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. तुळजापूर पोलीस ठाण्यात कलम 294,208, 269,188 करण्यात आला आहे.
 
Top