Views


*ज्येष्ठ नागरिक व गरोदर महिलांना 
धार्मिक स्थळे सशर्त स्वरूपात खुली*

  उस्मानाबाद /प्रतिनिधी


जिल्हयातील धार्मिक स्थाने आणि प्रार्थना स्थाळे ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या अटीच्या अधिन राहून जिल्हा अपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी खुली केली आहेत. 
     महाराष्ट्र शासनाने कोव्हिड 19 या विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्याच्या अनुषंगाने ‘Break the Chain’ अंतर्गत नवीन मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्ह्यात आता या आदेशांनुसार, ज्या 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर स्त्रियांचे कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झालेले आहे आणि लसीकरणाच्या दुसऱ्या मात्रेनंतर 14 दिवस पूर्ण झालेले आहेत अशा 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर स्त्रियांनासुद्धा धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळांना भेट देण्याची मुभा दिली आहे.
  धार्मिक स्थाने,प्रार्थना स्थळांच्या क्षेत्रात प्रवेश करताना मुख आवरण (मास्क) घालणे, शारिरिक अंतर राखणे, औष्णिक पटेक्षण (थर्मल स्कॅनिंग) आणि हात धुणे किंवा रोगाणुरोधक यंत्र अनिवार्य असेल या शिवाय कोविड-19 च्या फैलावास प्रतिबंध करण्यासाठीच्या उपाय योजनांवर प्रमाणित कार्यचालन कार्यपद्धती (एसओपी) मधील अटी व शर्ती लागू राहतील. 
  याशिवाय कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी निर्देशित केलेल्या आदेशात विहित केलेले शारिरिक अंतर राखणे आणि खबरदारी याबाबतच्या सर्व निकषांचे पालन करणे आवश्यक राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 51 ते 60, महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणा-या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील.
  

 
Top