*कसबे तडवळे या गावातील तब्बल ६० शिष्यवृत्ती उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने बक्षीस वितरण सोहळा*
उस्मानाबाद/प्रतिनिधी
तालुक्यातील कसबे तडवळे येथील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या केतन कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा भव्य दिव्य सत्कार बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव ज्येष्ठ नेते तानाजी मामा जमाले, शाळा व्यवस्थापन समितीचे सुधाकर गुळवे मंगेश पाटील उमाताई खडके सतीश करंजकर, रासपचे तालुकाध्यक्ष लोकरे साहेब इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेस पूजन करून व केतन कदम चा वाढदिवसानिमित्त सत्कार करून मान्यवरांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. यावेळी जिल्हा परिषद शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांच्या चढता आलेख यंदाही कायम आहे यावर्षीही जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेचे पन्नास विद्यार्थी तर जयहिंद विद्यालयाचे नऊ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत तर पात्र 60 विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे शालोपयोगी साहित्य भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मराठी मुलींच्या शाळेतील साक्षी जाधव सई माने अनुष्का मोहिते सिद्धी गवळी अशिया शेख श्रावणी वाघे ईश्वरी थोरात प्राची सुरवसे ज्ञानेश्वरी जाधव नम्रता जाधव रोहिणी करंजकर प्रगती कोरे गौरी ढवळे तेजल सुपनावर सृष्टी माने सृष्टी लोकरे मीनाक्षी पाठक श्रद्धा पवार मोहिनी सुतार समृद्धी भालेराव पलक बागरेचा श्रेया राऊत अनुष्का समुद्रे रोहिणी भगत सृष्टी कपाळे साक्षी पवार स्वामिनी थोडसरे गौरी जोशी पूजा डुमणे सिद्धी शिनगारे ऋतुजा होगले श्रावणी कपाळे संस्कृती माने मधुरा पाटील यानंतर मराठी मुलांच्या शाळेतील अपूर्व माळकर श्रेयश पवार पियुष कोकाटे वेदांत जाधव गजानन निकम सोहम कदम सार्थक पवार पृथ्वीराज आवटे गुरु पुरी मयुर सपाटे यासीन फकीर श्रेयस चव्हाण कोतवाल ऋषीराज कांबळे गणेश उगले प्रतिक बोबडे श्रेयश कदम सर जयहिंद विद्यालयातील विद्यार्थी ओम जमाले मानस पाटील संध्या हावळे प्राची बडके श्रुतिका शिंदे अभय जमाले आशिष माळी निखिल कुकडे कृष्णा लंगडे इत्यादी विद्यार्थ्यांचा सत्कार करून बक्षीस वाटप करण्यात आले.यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक वृंदाचा सत्कार करण्यात आला . कार्यक्रमास उपस्थित निलेश जाधव तानाजी मामा आदींनी मार्गदर्शन केले.यावेळी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी सदस्य सुनील बापू डिकरे, गणेश कांबळे, संकेत पाटील अभिजीत होगले सुमीत काकडे मनोज चाळक ज्ञानेश्वर इंगळे विजय इंगळे दत्ता जाधव लखन जाधव मनोज निकम पाटील आदींनी कार्यक्रम पार पाडण्यास सहकार्य केले यावेळी उपस्थित मार्गदर्शक धायगुडे सर सय्यद सर जमाले सर पालखी पालखी सर ठाकरे सर व पवार सर आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कपिल पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन आकाश विभुते यांनी मानले.