*मुरुडा नदीवरील पूलावरुन वाहतुक सुरू
दुधगावकर यांच्या पाठपुराव्याला यश*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी रस्त्यावर मुरुडा नदीवर पाण्याने पुल वाहून गेला होता. त्यामुळे वाहतूक ठप्प होवून परिसरातील नागरिकांची गैरसोय झाली होती. याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी लक्ष देवून पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्यास यश आले असून रस्ता सुरळीत झाला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकर्यांसह नागरिकांनी दुधगावकर यांचे आभार व्यक्त केले आहेत.कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी रस्त्यावरील मुरुडा नदीवरील पूल अतिवृष्टीने झालेल्या पावसामुळे अर्धा वाहून गेला होता. येथून ये-जा करताना शेतकर्यांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यासोबत वाहतूक बंद असल्यामुळे शेतीचे कामेही बंद झाली होती. याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी तत्काळ पाहणी करत येथील शेतकर्यांना येत्या दोन दिवसात हा पूल सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. या फुलाच्या दुरुस्तीसाठी मोठी यंत्रणा उपलब्ध करून संजय पाटील दुधगावकर यांनी हा पूल वाहतुकीस सुरळीत करून दिला आहे. त्याबद्दल येथील शेतकर्यांसह गावातील नागरिकांनी दुधगावकर यांचे आभार व्यक्त केले आहेत.