Views




*साईनगर मधील रस्ता न झाल्यास येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार , लोकप्रतिनिधीचे साफ दुर्लक्ष,तर नागरिकांचा जीव मेटाकुटीला!*


कळंब /प्रतिनिधी

 शहरालगत असणाऱ्या साईनगर समोरील रस्ता मेघा कंपनी ने उखडून टाकला तो रस्ता जोडण्यासाठी आमदार, खासदार, नगरसेवक, नगराध्यक्ष, इतरही लोक प्रतिनिधी व अधिकारी यांच्यासमोर साईनगर वासियांनी अक्षरशा निवेदनाचा ढीग लावला तरी न कुठल्या अधिकाऱ्यांना ना लोकप्रतिनिधीं ना घाम फुटला. या रस्त्यावरून महिला, वृद्ध नागरिक, यांना मात्र रस्त्यावरून चालताना तारेवरची कसरत करावी लागते. लहान मुले सायकल मोटार सायकल घेऊन अक्षरशा रोडवर ती पडून सोलून निघाली, अपघात झाले कुणाचे हात ,पाय मोडले, कोणाच्या पाठीला दुखापत झाली याकडे कोण लक्ष देणार, याविषयी साईनगर चे मुख्य प्रवर्तक संजय देवडा यांच्या अध्यक्ष खाली दि. १० रोजी तातडीची बैठक घेऊन येणाऱ्या नगरपरिषद असो की लोकसभा, विधानसभा या निवडणुकीत मतदानावर पूर्ण साईनगर मधील रहिवाशी बहिष्कार घालणार असल्याची घोषणा यावेळी एक मुखी ने बैठकीत करण्यात आली. जोपर्यंत हा रस्ता शासन किंवा लोकप्रतिनिधी करून देणार नाहीत तोपर्यंत साईनगर या भागातील नागरिक मतदानावर पूर्णपणे बहिष्कार घालतील या भागात जवळपास 225 कुटुंब रहिवाशी असून या बहिष्काराच्या निर्णयामुळे तरी प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. मेगा इंजिनिअरिंग कंपनीने अनेक भागात अनधिकृतपणे रस्ते तयार केले नाल्या तयार केल्या पण साईनगर समोर ना रस्ता ना नाली यामुळे हा भाग कळंब च्या हद्दीत येतो की पाकिस्तानच्या हद्दीत जातो असा प्रश्न निर्माण झाला आहे. या बैठकीसाठी विलास मुळीक ,माणिकराव लांडगे, यशवंत हरकर, बाळासाहेब लोमटे, चंद्रकांत यशवंत ,उद्धव गीते, नागेश टोंणगे, भागवत मोरे ,प्रशांत सलगरे ,सचिन एरंडे, नामदेव सुतार ,सुशिल सोनी, महारुद्र वाघचौरे, राजाराम कोळी, नानासाहेब कवडे, विजयकुमार पाटोळे, पांडुरंग जाधव, गणेश डोंगरे ,बाबासाहेब कांबळे, तुकाराम गरूडे, बळीराम ढवळे, शामराव कोयले, शिवशंकर चोपणे, मनोज कदम , संतोष कोळी ,राम प्रल्हाद पडेकर ,आदींनी परिश्रम घेतले. पांडुरंग टेळे, सूर्यकांत वाघमारे यांच्यासह आदी सभासद नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top