Views




*कसबे तडवळा ता.उस्मानाबाद येथील तेरणा ट्रस्टच्या आरोग्य शिबीरात 560 पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी व उपचार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन मंगळवार दि.१२ ऑक्टोबर २०२१ रोजी, मौजे कसबे तडवळे ता.उस्मानाबाद येथे सकाळी १०:०० ते ५:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीराचा नांदुरी व परिसरातील सर्व वयोगटातील ५६० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला. या शिबीराचे उद्दघाटन ज्येष्ठ नागरीक पोपट पाटील यांच्या हसते झाले. यावेळी जि.प.सदस्य नाना वाघ, ॲड.महेश निंबोळे, प्रभाकर ढमे, दत्तुपंत जगताप, सुरज पाशा शेख, जगन्नाथ विभुते, विकास मुळे (पत्रकार), अरुण निकम (पत्रकार), धनाजी होगले, गणेश करंजकर, उमाकांत होगले, वैभव रेडे, अबरार कोरबू सर्व ग्रा.प.कर्मचारी ग्रामस्थ उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.परवीन सय्यद, डॉ.ऋषिकेश जाधव, डॉ.प्रणित गणविर, डॉ.जय गोयल, डॉ.आयुष गुप्ता, डॉ. आदित्य बोरकर, डॉ.योगेश मोरे, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तडवळा उपकेंद्राच्या सी. एच.ओ.डॉ.सुवर्णा पाटील, आशा कार्यकर्त्यां सुष्मा सर्जेराव कुकडे, शोभा संतोष डुमणे, सुवर्णा व्यंकट लोहार, महानंदा मामलेश्वर वाघमारे, रंजना श्रीपती राऊत, संगीता भगवान राजले, अंजली गणेश कुमणे, प्रियंका मच्छींद्र डोलारे व तेरणा जनसेवा केंद्राचे सुजीत पाटील, विनोद ओहळ, रवी शिंदे, पवन वाघमारे, संदीप चव्हाण, शोभा मगर, आशा कार्यकर्त्या ईत्यादींनी परीश्रम घेतले.
 
Top