Views


*''आजादी का अमृत महोत्सव'' अंतर्गत विद्याभवन हायस्कूल कळंब याठिकाणी कायदेविषयक जागरूकता शिबीर संपन्न..*


कळंब /प्रतिनिधी

 तालुक्यामध्ये दिनांक ०२ ऑक्टोबर २०२१ ते १४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत साजरा होत असलेल्या ''आजादी का अमृत महोत्सव'' अंतर्गत भारतभर जागरूकता व पोहोच कार्यक्रम (Pan India Awareness and Outreach Programme) च्या अनुषंगाने महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती कळंब व विद्याभवन हायस्कूल कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ ऑक्टोबर, २०२१ रोजी विद्याभवन हायस्कूल कळंब या ठिकाणी NALSA (मुलांसाठी बालमित्र कायदेशीर सेवा आणि त्यांचे संरक्षण) योजना, २०१५ {Awareness about NALSA (Child Friendly Legal Services to the Children and their Protection) Scheme, 2015} विषयावर कायदेविषयक जागरूकता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
  सदरील शिबीराचे प्रास्ताविक करताना विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. श्री. मंदार मुळीक यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना शिक्षणाशिवाय कोणीही जीवनामध्ये ध्येयप्राप्ती करू शकत नसल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे आजच्या युगामध्ये कायदेविषयक मार्गदर्शन किती महत्त्वाचे आहे हे नमूद करून आजादी का अमृत महोत्सव निमित्त आयोजित होत असलेल्या शिबीराचा निश्चितच सर्वसामान्यांना लाभ होत असल्याचे नमूद केले. सदरील शिबीरामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कळंब तथा दिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब श्री. महेश ठाेंबरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अनुषंगाने बाेलताना त्यांनी बालकांशी संबंधित असलेल्या विविध कायदेविषयक बाबींवर मार्गदर्शन करताना NALSA (मुलांसाठी बालमित्र कायदेशीर सेवा आणि त्यांचे संरक्षण) योजना, 2015 या योजनेची सविस्तर माहिती उपस्थित मुलांना दिली. तसेच बालकांसाठी असलेल्या विविध कायद्यांबाबत सविस्तर असे मार्गदर्शन करून वाईट कृत्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त होण्यासाठी क्षणाचाही वेळ लागत नसल्याचे सांगून सर्वांनी चांगल्या मार्गाचा अवलंब करून गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर राहण्याचा मोलाचा सल्ला उपस्थित विद्यार्थी यांना दिला. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. विक्रम मायाचारी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. सोनके सर यांनी केले.
  सदरील जागरूकता शिबीरासाठी अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश क. स्तर कळंब श्री. महेश ठाेंबरे, विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. श्री. मंदार मुळीक, गटशिक्षण कार्यालय येथील विस्तार अधिकारी श्री. जगदाळे सर, विद्याभवन हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. विलास पवार सर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सदरील कार्यक्रमासाठी न्यायालयीन कर्मचारी कनिष्ठ लिपीक इरफान मुल्ला, शिपाई सावनकुमार धामनगे, संतोष भांडे, प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी माेठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्याभवन प्रशालेचे लिपीक पांचाळ सर, नलावडे सर, मायाचारी सर, सोनके सर आदींनी परिश्रम घेतले.
 
Top