Views




*सांगली जिल्हा ग्रामीण भाग हद्दीतील रस्ते खड्डे मुक्त करण्याची मागणी राष्ट्र विकास सेनेने केली आहे*


 सांगली:-

     सांगली जिल्हा परिषद ग्रामीण भागातील अंतर्गत मृत्यूचा साफळा बनलेल्या रस्त्यावरच्या खड्यांचे तात्काळ दुरुस्ती करून रस्ते सुस्थितीत व रस्ते खड्डे मुक्त झाले पाहिजेत या मागणीसाठी उद्या राष्ट्र विकास सेनेच्या वतीने प्रशासन ,लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधण्यासाठी युवक प्रदेश अध्यक्ष मा प्रशांतभाऊ सदामते यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा परिषद समोर बुधवार 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 12 वाजता लक्षवेधी निदर्शने करण्यात आली,यावेळी अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदारपणे घोषणाबाजी करण्यात आली,नागरीक घरपट्टी पाणीपट्टी व इतर कर 100 टक्के भरत असतात मग नागरिकांना ही त्यांच्या सोयीसाठी रस्ते सुस्थितीत असायला हवेत,हजारो कोटींचा निधी रस्ते दुरुस्ती साठी असतो तो कुठे जातो असाही प्रश्न उपस्थित झाला आहे,रस्त्यावर छोटे मोठे अनेक अपघात दररोज होत असतात, त्यांना व कुटुंबातील व्यक्तींना जिल्हा परिषद भरपाई देणार का,रस्त्यावर खड्डे जे तयार झालेत हे नागरिकांच्या जीवशी खेळत असल्याने जिल्हापरिषद अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी युवा नेते प्रशांतभाऊ सदामते यांनी केली,यावेळी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा चंद्रकांत गुड्डेवार यांना निवेदन देण्यात आले,जर ग्रामीण भागातील नागरिकांना सुस्थितीत रस्ते मिळाले नाहीत तर अधिकारी यांच्या तोंडाला काळे फासून रास्तवरून धिंड काढल्या शिवाय राहणार नाही असे प्रशांतभाऊ सदामते यांनी इशारा दिला यावेळी आंदोलनात कु ऐश्वर्या कोळी पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्ष,मा सारिका जमदाडे महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष,मा.शशिकांत दुधाळ जिल्हा सचिव,मा.महेश महाजन उपाध्यक्ष ,मा महेश चेंडके रिक्षा वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष, मा महेश साठे सांगली जिल्हा उपाध्यक्ष, मा रोहिणी पोतदार महिला आघाडी उपाध्यक्ष, मा अनिता माने शिरोळ तालुका अध्यक्ष, मा संदीप देवकते उपाध्यक्ष,मा फर्याद सय्यद उपाध्यक्ष रिक्षा वाहतूक सेना,कु ज्योती सरगर सा मि कु मनपा क्षेत्र युवती अध्यक्ष, दीपक पाटील आदी राष्ट्र विकास सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते*

सांगली जिल्हा ग्रामीण भागात वाली कोण?

जिल्हा परिषद अंतर्गत नागरिकांना सुस्थितीत रस्ते कधी मिळणार? 

सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते खड्डे मुक्त कधी होणार?



 
Top