Views


*चोरीच्या टेम्पो सह आरोपी ताब्यात परंडा पोलिसांची कामगिरी*

परंडा/प्रतिनिधी

परंडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गिड्डे हे सहकार्यासह गस्त घालत असताना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की परंडा तालुक्यातील मौजे वडनेर येथील विठ्ठल शहाजी खांडेकर यांचे कडे चोरीचा टेम्पो आहे अशी माहिती मिळाल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचेकडे खात्री केली असता त्याच्या ताब्यात टाटा कंपनीचा टेम्पो क्रमांक MH 13 B 4916 चॉकलेटी रंगाचा टेम्पो मिळून आला त्याच्या कडे टेम्पो चे कागदपत्र बाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली त्यास विश्वासात घेऊन विचारपूस करता त्याने सदर टेम्पो त्याचे मामाचा मुलगा महादेव नागनाथ सलगर राहणार उंडेगाव तालुका बार्शी याचे कडून विकत घेतला असल्याचे सांगितले सदर टेम्पोची खात्री केली असता सदर टेम्पोचा मूळ नंबर एम एच 42 B -4509 असा असल्याचे व टेम्पो कुरकुंब तालुका दौंड येथून चोरून आणलेची माहिती प्राप्त झाल्याने दौंड पोस्टेकडे माहिती घेता फिर्यादी अरुण खंडू भागवत राहणार कुरकुंभ तालुका दौंड यांनी त्यांचा टेम्पो चोरी केल्याबाबत त्यांनी 19 एप्रिल 2021 रोजी पोलीस स्टेशन दौंड येथे टेम्पो चोरी गेले बाबत फिर्याद दिल्याचे समजले सदर चोरीचा टेम्पो किंमत 310000 रु चा व सदरचा चोरीचा टेम्पो नंबर चेंज करून वापरणारे विठ्ठल शहाजी खांडेकर राहणार वडनेर तालुका परंडा यांना पकडून दौड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले 
    या कार्यवाही मध्ये पोलिस निरीक्षक गिड्डे,
पोना.खोसे, मपोना जिज्ञासा पायाळे , शेख , गायकवाड चालक पोना रोटे यांचे सहभाग होता 
Top