Views


*विकासरत्न आमदार डॉ.तानाजी सावंत लवकरच
 जनतेच्या दरबारात-उपशहर प्रमुख प्रशांत साळुंके*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला


उस्मानाबाद जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा भूम-परंडा-वाशी तालुक्याचे विकासरत्न शिवसेनेचे संपर्कप्रमुख तानाजी सावंत आजापणातून बरे होऊन लवकरच जनतेच्या दरबारात येतील असा आशावाद शिवसेनेचे उस्मानाबाद उपशहर प्रमुख प्रशांत साळुंके यांनी समाज माध्यमातून व्यक्त केला आहे. उस्मानाबाद जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले अशा परिस्थितीत माजी जलसंधारण मंत्री तथा भूम-परंडा-वाशी चे आमदार डॉ.तानाजी सावंत हे शेतकऱ्यांच्या मदतीला आले नसल्याची आवई विरोधकांनी उठवली यासंदर्भात साळुंके यांनी वस्तुस्थिती मांडले आहे त्यांनी सांगितले की १ हजार बेड असणारे सुसज्ज आणि भव्यदिव्य असे कोविड सेंटर तानाजी सावंत यांनी स्वखर्चातून उभारले हा राज्यांमध्ये त्यांनी केलेला आगळा- वेगळा पॅटर्न आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाला त्यांनी ऑक्सिजनचे ड्युरो सिलेंडर आणि अत्यावश्यक रुग्णसेवेसाठी त्यांनी वेळोवेळी मोलाची मदत केलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने जनतेच्या संपर्कापासून दूर आहेत मात्र याबाबतचे त्यांनी कधीही भांडवल केले नाही. कोरोना संसर्गजन्य साथ रोगाचे निदान झाल्याबरोबर डेंग्यूचा तापाने डॉ सावंत यांना बेड रेस्ट सक्तीची केली. या आजारातून बरे झाल्यानंतर ते लवकरच जनतेच्या दरबारात येणार असल्याचे साळुंके यांनी सांगितले
 
Top